Pimpri News : ‘महागाई वाढवून मोदी सरकार कोणते ‘अच्छे दिन’ आणत आहे ?’

'माकप'चा संतप्त सवाल ; घरगुती गॅस दरवाढी विरोधात निदर्शने :

एमपीसीन्यूज : सरकारने गेल्या आर्थिक वर्षात इंधन आणि घरगुती गॅसच्या किमती वाढवून लाखो कोटी रुपयांचे कर गोळा केले आहेत. त्यामुळे मोदी सरकार कोणत्या प्रकारचे ‘अच्छे दिन’ आणत आहे ?. सरकार स्वतःच्या खिशातून काहीच देत नाही. कार्पोरेट उद्योगांना सवलती आणि कर्ज माफी दिली जात आहे. आणि कोट्यवधी बेरोजगार गोरगरिबांच्या खिशातून त्यांची तुटपुंजी कमाई हिरावून घेत आहे, अशी जोरदार टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव गणेश दराडे यांनी केली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोदी सरकारच्या महागाईच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. त्यावेळी दराडे बोलत होते.

दराडे म्हणाले की, जुलै 2020 मध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 637 रुपये होती. संपूर्ण वर्षात सरकारने इंधन दरवाढ करून जनतेला मेटाकुटीस आणले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल बरोबर घरगुती गॅस च्या किमती 35 टक्यांनी वाढवल्या आहेत. आज गॅस सिलिंडर 835 रुपये दर आहे. कोरोना काळात दरवाढ करून सरकारने सबसिडी बंंद केली आहे.

तर कोरोना संकट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रोजंदारी कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक, बिगारी कुटुंबाना आर्थिक दिलासा न देता केंद्र सरकारने महागाईचे भूत स्वयंपाक घरात आणून सोडले आहे. एका वर्षात 200 रुची सिलिंडरची दरवाढ करून सामान्य कुटुंबाची सरकारने चूल बंद केली आहे, असा आरोप माकपच्या महिला नेत्या अपर्णा दराडे यांनी केला.

केंद्रसरकरने एक वर्षात 3 लाख कोटी रुपयांची कमाई इंधन आणि गॅस दरवाढीतून केली आहे. जनता संतप्त आहे. महिला गृहिणी त्रस्त आहेत, याचा विचार केंद्र सरकारने करावा, असेही अपर्णा दराडे म्हणाल्या.

घरगुती गॅस सिलिंडर जुलै 2020 च्या किमतीवर स्थिर करा, अथवा 250 रुपये अनुदान द्या. रेशनवर तेल, साखर, डाळी सहित अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत 13 वस्तूचे रास्त दारात वितरण करा. पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर 27 टक्क्यांनी कमी करा. कार्पोरेट टॅक्स वाढवा, सरकारी दौरे, प्रशासकीय खर्च कमी करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी सतीश नायर, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, अमिन शेख, बाळासाहेब घस्ते, प्रकाश शिवेकर, दिलीप पेटकर, स्वप्निल जेवळे, शेहनाज शेख, सतीश शिंदे, वीरभद्र स्वामी, अनिता शेरकर, ज्योती मुलमुले, रिया सागवेकर, संगीता देवळे, योगिता कांबळे, हरीकुमार, अब्राहम, निकिता कनना, शांता इसरन, अफसना शेख, जॉर्ज वर्गीस, रेखा सोनवणे, दामोदरन, नागमा कन्न, आशा बर्डे, मंगल डोळस, वंदना शिवशरण, यल्लमा कोलगवी, रेश्मा शेख, राजिया शेख, लक्ष्मी अवलोळ, लक्ष्मी जगले, प्रगती डिंगोळे, उमा मधुरे, कविता व्यास, कोमल गवंडी, सुनीता कुरळेकर, वैशाली लोकरे, सुनीता कनोजिया,सरुबाई सुरवसे, जीनू कनोजिया,राजाबाई कांबळे, कल्पना भालेराव, सुधा गायकवाड,पूनम सुतार,सारिका जंगले, विजया कांबळे,ज्योती कांबळे,,धनश्री कनोजिया, सरिता सूर्यवंशी, अनुसया राठोड यांच्यासह महिला, युवक, रिक्षा व्यवसायिक निदर्शनात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.