Pimpri News: परदेशातून शहरात येणा-यांना विमानतळावरच क्वारंटाईन करा, महापौरांची प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा पिंपरी-चिंचवड शहरात प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात येणा-यांना विमानतळावरच 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करावे, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला केली.

परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले 3 आणि त्यांच्या संपर्कातील अशा 6 जणांना  ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाला आहे. एकाचदिवशी 6 रुग्णांना संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली. महापौर उषा ढोरे म्हणाल्या, कोरोनाच्या पहिला, दुस-या लाटेनंतर ओमायक्रॉनचे नवीन संकट आले आहे. शहर पुन्हा टेन्शनमध्ये आले आहे. ओमायक्रॉनला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी. उपयायोजना हाती घ्याव्यात. नागरिकांनीही प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

महापौर ढोरे म्हणाल्या, परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात येणा-या प्रत्येक नागरिकाला विमानतळावरच क्वारंटाईन करावे. सक्तीने त्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवावे. कोरोनाची चाचणी निगेटीव्ह, कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांना क्वारंटाईन करावे. जेणेकरुन ओमायक्रॉनचा शहरात प्रसार होणार नाही. त्यानुसार प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. त्यावर आयुक्त राजेश पाटील म्हणाले, सरकारकडून प्रोटोकॉला आला आहे. त्यामध्ये बदल करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.