Pimpri news: मृत कोरोना योद्धयांच्या वारसांना महापालिकेकडून आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत पावलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 13 कर्मचा-यांच्या वारसांना महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. प्रत्येकी 25 लाखांची ही आर्थिक मदत पालिकेकडून करण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, अविनाश ढमाले, कामगार कल्याण विभागाच्या लिपिक माया वाकडे आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या संकटात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच, कंत्राटी, हंगामी, रोजदारी, मानधनावरील तसेच आउटसोर्समधील कामगारांनी काम केले. सद्यस्थितीतही संकटाच्या घडीला हे कर्मचारी काम करत आहेत.

कोरोना काळात काम करताना दुर्देवी मृत्यू झाल्यास कर्मचा-यांच्या वारसांना महापालिकेकडून 25 लाखांचे सुरक्षा कवच दिले जाते. त्यानुसार 13 कर्मचा-यांच्या वारसांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

त्यामध्ये कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे, स्टाफनर्स शोभा भुजबळ, एम. पी.डब्लू भालचंद्र राऊत, रखवालदार तायप्पा बहिरवाडे, तानाजी धुमाळ, शिपाई संभाजी पवार, लिफ्टमन मोहंम्मद शेख, क्लिनर अनिल ठाकुर, वार्ड बॉय ज्ञानेश्वर जाधव, मजुर अनंत कळबांटे, हनुमंत वाडेकर, मारुती शेंडगे यांच्या वर्षांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.