Crime News : पिंपरी पोलिसांकडून तीन हजार रुपयांची ताडी जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील पत्राशेड परिसरातून पिंपरी पोलिसांनी तीन हजार रुपयांची 30 लीटर अवैध (Crime News) ताडी जप्त केली आहे.

 

Crime News : निगडी येथे टोळक्याचा कोयते हातात घेत धुडगूस

 

याप्रकरणी बाळासाहेब नागप्पा मुंढे (वय 33, रा.गांधीनगर, पिंपरी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र तो सध्या फरार आहे. पोलिसांना माहीती मिळाल्यानुसार पत्राशेड येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्यांनी तीन हजार रुपयांची ताडी (Crime News) व 300 रोख जप्त केले. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.