Pimpri: महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रघुनाथ कुचिक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांची वर्णी लागली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी ही नियुक्ती केली आहे. कुचिक पुण्यातील असल्याने त्यांच्या निवडीमुळे औद्योगिकनगरीतील कामगारांचे प्रश्न, त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुण्यात वास्तव्यास असलेले डॉ. रघुनाथ कुचिक हे भारतीय कामगार सेनेचे विद्यमान सरचिटणीस आहेत. कामगार क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे. त्यांनी शिवसेनेचे पुण्याचे उपशहरप्रमुख पद देखील सांभाळले आहे. त्यांची नुकतीच शिवसेनेच्या उपनेतेपदी वर्णी लागली आहे.

राज्य सरकारने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्त्या शुक्रवारी (दि.31) जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये डॉ. रघुनाथ कुचिक यांची महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुचिक यांच्या निवडीमुळे औद्योगिकनगरीतील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.