Pimpri : ‘कोरोना’विरूद्धच्या लढाईसाठी टाटा समूहाकडून एकूण 1500 कोटींची मदत

एमपीसी न्यूज – टाटा ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रथम 500 कोटी रुपये व टाटा सन्सने 1000 कोटी रुपये अशी टाटा उद्योगसमूहाने एकूण 1,500 कोटी रुपयांची मदत केली आहे. टाटा ट्रस्टने आजवर केलेली सर्वात मोठी मदत ही आहे. यापूर्वी बजाज ग्रुपने 500 कोटी रुपयांची मदत करोनाशी लढण्यासाठी सरकारला देऊ केली होती.

रतन टाटा यांनी ट्वीटद्वारे माहिती देताना सांगितले, ‘करोना’चं संकट हे मानवजाती समोरील अत्यंत कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी यापूर्वी देशाच्या गरजा भागवल्या आहेत. सध्याचं संकट हे मानवी शर्यतीला भेडसावणार्या कठीण आव्हानांपैकी एक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.