Pimpri News : दि सेवा विकास बँकेच्या बक्षानी यांच्यावर पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज पिंपरीतील दि सेवा विकास बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करणारे मनोज लक्ष्मणदास बक्षाणी यांच्यावर (Pimpri News) पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.13) पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. बँकेतील महिला कर्मचाऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत गैरवर्तन केल्या प्रकरणी हे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Talegaon Dabhade : राष्ट्रवादी अनुसूचित जाती सेलच्या शहराध्यक्षपदी मनीषा रघुवंशी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला बँकेत साफ-सफाईचे काम करतात. दिड महिन्यापुर्वी बँकेत साफ सफाई करत असताना, आरोपी बक्षानी यांनी फिर्यादीला (Pimpri News) ते बसलेले असलेल्या टेबल खाली धुळ असल्याचे सांगितले, फिर्यादी वाकून सफाई करत असताना बक्षानी यांनी तिच्याशी गैरवर्तन केले.

तसेच हि बाब कोणाला सांगयची नाही सांगितली तर खोट्या गुन्ह्यात अडकवून कामावरून काढून टाकेन अशी धमकी दिली. या आधीही बँकेतील दुसऱ्या एका महिला कर्मचाऱ्यास वरीष्ठांच्या मर्जीनुसार वाग, नाही तर खोट्या गुन्हात अडकवून तिच्याशीही गैरवर्तन केले होते.पिंपरी पोलीस ठाण्यात दोन्ही गुन्हे दाखल केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.