Pimpri : लायन्स क्लब क्रिकेट स्पर्धेचे एसएनबीपी मोरवाडी संघाला विजेतेपद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन व लायन्स क्लब रहाटणी (Pimpri) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 14 वर्षाखालील लायन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत एस एन बी पी (मोरवाडी) संघाने विजेतेपद मिळवले. 

अंतिम सामना आर एस पी (दिघी) येथे पार पडला झाला. एस एन बी पी मोरवाडी या संघाने प्रथम पारितोषिक मिळवत रोख रक्कम रुपये 11 हजार व लायन्स ज्युनियर करंडक स्मृती चिन्ह प्राप्त केले.  तसेच एस एन बी पी स्कूल(रहाटणी) यांना  रोख रक्कम रुपये 7 हजार व स्मृतिचिन्ह,  जी जी इंटरनॅशनल यांना स्कूल रोख रक्कम रुपये 5 हजार व चषक देण्यात आले.

 

Pune : शरद मोहोळवर गोळ्या झाडणारा साहिल पोळेकर मोहोळसोबत होता फिरत; आरोपींसोबत होते दोन वकील?

उत्कृष्ट फलंदाज म्हम्हणून  गोदावरी हिंदी विद्यालयाचा शादाब पाशा याला मान मिळाला. उत्कृष्ट गोलंदाज एस एन बी पी मोरवाडीचा पूर्व पटेल ठरला. या स्पर्धेतला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू एस एन बी पी मोरवाडी दीप पाटील हा ठरला.

बक्षिस वितरण समारंभ लायन्स क्लबचे अध्यक्ष अमोल दापोरकर यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी पिंपरी (Pimpri) चिंचवड असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे,अरुण जागडे,मुकेश गुजराथी सभासद हर्ष नायर, शिरीष हिवाळे,राम कृष्ण मंत्री प्रमोद भोंडे,डाॅ जयश्री कोतवाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव राजू कोतवाल यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश गुजराथी यांनी केले.

धावफलक:-
एस एन बी पी(मोरवाडी) 20 षटकांत 4 बाद 169
(आयुष भावसार 30, दीप पाटील 75, अथर्व काळे 45, सिद्धार्थ पटेल 2/36, अभिराज देशमुख 10/1 एस एन बी पी(रहाटणी) 18.2 षटकांत सर्वबाद 124
(अभिराज पारखे 37, तेजस संघवी 17 पूर्व पटेल 3/10,अथर्व काळे 2/21) 1 एस एन बी पी स्कूल(मोरवाडी).

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.