Pimpri: स्कूल डेस्क खरेदीसह स्थायी समितीची 38 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – शिक्षण विभागाच्या बालवाड्यांसाठी स्कूल डेस्क खरेदीसाठी येणाऱ्या सुमारे 1 कोटी 86 लाख खर्चास विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे 37 कोटी 75 लाख इतक्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते. प्रभाग क्र.2 जाधववाडी मधील गट नं 539 विकसित करणेकामी येणाऱ्या 11 कोटी 96 लाख खर्चास, 2 ऑक्टोंबर 2014 पासून केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. संपुर्ण देशभर केंद्र शासनामार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2020 राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने नागरीकांमध्ये जनजागृती, माहिती व प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेस येणाऱ्या सुमारे 1 कोटी 53 लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मनपाचे आरोग्य विभागास आवश्यक औषध खरेदीकामी येणाऱ्या 28 लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. क्रिडा विभागास विविध व्यायाम शाळांकरीता आवश्यक विविध व्यायामशाळा साहित्य खरेदीकामी येणा-या सुमारे 1 कोटी 21 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ई- क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. 3 मधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक दुरूस्ती ठेकेदारी पद्धतीने देखभाल व दुरूस्ती करणेकामी येणा-या 27 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.6 ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या 40 लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या से.23 पंपहाऊस पंपिग मशिनरीचे व डिझेल जनरेटरचे देखभाल दुरूस्ती करणेकामी 37 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 5 मधील भोसरी आळंदी रस्ता सुशोभिकरण व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या 64 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.3 मधील उर्वरित भागात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या 50 लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. क क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या नाल्यातील अस्तित्वात असलेली ड्रेनेज लाईन रस्त्यावर स्थलांतरित करणेकामी येणाऱ्या 76 लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 8 ड्रेनेज लाईन जलनि:सारण नलिका टाकणे व दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या 91 लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 27 रहाटणी मधील तापकीर चौक ते तापकीर मळा चौक परिसर व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्था सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या 61 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.8 मधील सेक्टर नं. 4 व 6 व उर्वरित भागात आवश्यकतेनुसार नविन ड्रेनेज लाईन टाकणेकामी येणाऱ्या 27 लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

शिव शाहू शंभो उद्यानातील मोकळ्या जागेत जिम्नेशियम हॉल बांधणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या 2 कोटी 39 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड मनपामार्फत नव्याने बांधणेत येणाऱ्या थेरगाव व चिंचवड येथील तालेरा रूग्णालय इमारतीसाठी आवश्यक त्या क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (ETP) उभारणे कामी येणाऱ्या 3 कोटी 67 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 21 पिंपरीमधील तपोवन मंदिर परिसर, वैभवनगर, झुलेलाल घाट परिसर, डिलक्स चौक परिसर व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्था सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या 83 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 32 मध्ये सुआशी हॉटेल गल्ली, शिवाजी पार्क व उर्वरित परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेसाठी येणाऱ्या 46 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.