Pimpri : औंध मधील राजीव गांधी पूल वाहतुकीसाठी खुला; शहरातील नऊ पूल दुस-या दिवशीही बंदच

एमपीसी न्यूज – औंधगाव ते डांगे चौक मार्गावर मुळा नदीवर असेलेला राजीव गांधी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नदीतील पाण्याची पातळी काही प्रमाणात ओसरली असल्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. तरीही पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नऊ पूल अजूनही वाहतुकीसाठी बंदच आहेत.

वाहतुकीसाठी सुरु झालेले पूल –

# राजीव गांधी पूल (औंधगाव ते डांगे चौक मार्ग)

वाहतुकीसाठी बंद असलेले पूल –

# जुनी सांगवी पूल (स्पायसर कॉलेज ते जुनी सांगवी, नवी सांगवी मार्ग)
# महादजी शिंदे पूल (डी मार्ट औंध ते सांगवी मार्ग)
# थेरगाव घाट पूल (चिंचवड थेरगाव जोडणारा)
# धनेश्वर पूल (काळेवाडी – पिंपरी मार्ग)
# वाकड उड्डाणपूल (वाकड – हिंजवडीला जोडणारा) – पुलाला तडा गेल्याने बंद
# चापेकर चौक, मोरया गोसावी मंदिर ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बॅरीगेट लावून बंद
# कुदळवाडी ते मोईकडे जाणारा (इंद्रायणी नदीवरील पूल)
# शिक्रापूर – चाकणला जोडणारा भीमा नदीवरील पूल
# देहूरोड – मामुर्डीला जोडणारा लोखंडी पूल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.