Pimpri: दुकानाला आग लावल्याप्रकरणी तिघांना अटक; तीन लाखांचे नुकसान

Three arrested for setting shop on fire; Loss of three lakhs दुकानातील डेकोरेशन, बर्थडे साहित्य, मेणबत्त्या, कागदी पेपर असे एकूण तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

एमपीसी न्यूज- दुकानाला आग लाऊन सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना रिवर रॉड, पिंपरी येथे मंगळवारी (दि.30) पहाटे घडली.

सुर्यकांत अनंत माने (वय 26, रा. निराधारनगर, पिंपरी), कमल किशोर रमेश भट (वय 31), सोनू द्वारिकाप्रसाद सोंधीया (वय 21, दोघे रा. भारतनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी प्रकाश पन्नाराम गेहलोत (वय 38, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गेहलोत यांचे रिवर रोड, पिंपरी येथे दुकान आहे. आरोपींनी सोमवारी रात्री सात ते मंगळवारी पहाटे दीड वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर अर्धवट उचकटून आत प्रवेश केला.

दुकान नष्ट करण्याच्या उद्देशाने दुकानात आग लावली. त्यामध्ये दुकानातील डेकोरेशन, बर्थडे साहित्य, मेणबत्त्या, कागदी पेपर असे एकूण तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

आरोपींनी दुकानाच्या गल्ल्यातील दीड हजार रुपये चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.