Pimpri : आमदार अण्णा बनसोडे कोणासोबत ? शरद पवार की अजित पवार ?

बनसोडे यांचा दूरध्वनीला प्रतिसाद नाही

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासबोत उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे कोणासोबत राहणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शरद पवार यांनी आज दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला अण्णा बनसोडे हजार राहतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे काही आमदार फुटण्याची शक्यता आहे. शहराच्या राजकारणावर अजित पवार यांची पकड होती. अण्णा बनसोडे यांना महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्षपद, आमदारकीचे तिकीट अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे बनसोडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे बनसोडे हे अजित पवार की शरद पवार यांच्यासोबत जातात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांचे तिकीट कापत नगरसेविका सुलक्षणा धर यांना तिकीट दिले होते. परंतु, अजित पवार यांनी पुढाकार घेत धर यांचे तिकीट कापत पुन्हा बनसोडे यांना उमेदवारी दिली होती. बनसोडे निवडून देखील आले.

याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी बनसोडे यांना दूरध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.