Pimpri Vaccination News: शहरात शुक्रवारी 16 केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला सलग चौथ्या दिवशी ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44, 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार लस!
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, हेडगेवार जलतरण तलाव, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, जुने तालेरा रुग्णालय, नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, नवीन भोसरी रुग्णालय, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, महापालिका शाळा रहाटणी, जुने जिजामाता रुग्णालय, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी आणि कासारवाडी दवाखाना या केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे.

कोविन अ‍ॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत. ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.