Dapodi News: ऐन दिवाळीमध्ये वीजपुरवठा खंडित करू नका; पिंपरी युवासेनेची मागणी

एमपीसी न्यूज – ऐन दिवाळी मध्ये फुगेवाडी – दापोडी मधील वीजपुरवठा खंडित होऊ देवू नका, वीज बिल थकल्याने वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणी पिंपरी युवासेनेने महावितरणकडे केली.

पिंपरी युवासेनेचे विधानसभा अधिकारी निलेश हाके यांनी पिंपरी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश चाकूरकर यांना निवेदन दिले आहे. कोरोना काळातून सावरत असताना विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. महावितरणकडून विज बिल टप्प्याटप्प्याने आकारणी सुरू आहे.

नागरिकही आपापल्या परीने विज बिल भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच ऐन सणासुदीच्या काळात महावितरणकडून नागरिकांच्या घरातील वीज पुरवठा बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात येत आहे. ही कारवाई तूर्तास थांबून नागरिकांना दिवाळीच्या 15 दिवस मुभा द्यावी. त्यानंतर महावितरण कडून पुन्हा आपली कारवाई सुरू करण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.