PM Tweet : पंतप्रधान मोदी तसेच गडकरी, पवार यांच्याकडून शिंदे, फडणवीस यांचे अभिनंदन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Tweet), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी ट्वीट करून अभिनंदन केले तसेच शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन स्वतंत्र ट्वीट (PM Tweet) करून नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राला आणखी उंचीवर घेऊन जाणारे काम आपल्याकडून होईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

CM Ekanath Shinde : एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ;फडणवीस झाले उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी प्रेरणा आहेत, या शब्दांत मोदी यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करो, या सदिच्छा, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde Profile : रिक्षाचालक ते मुख्यमंत्री!; एकनाथ शिंदे यांचा नेत्रदीपक जीवनप्रवास

महाराष्ट्राच्या हिताची जपणूक एकनाथ शिंदे यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नवीन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.