PMAY : आकुर्डी, पिंपरीतील घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी व पिंपरी येथे राबविण्यात येत असलेल्या घरांसाठी अर्ज करण्यास 12 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Chinchwad : शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार गुंडाला अटक

या प्रकल्पाकरिता अर्ज ऑनलाईन भरुन घेण्यासाठी 28 जुलै 2023 रोजी पर्यंत जाहीर प्रकटनाद्वारे मुदत देण्यात आलेली होती. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न (PMAY) दाखला, जातीचा दाखला इ. कागदपत्रे मिळणेकामी नागरीकांना लागणारा विलंब लक्षात घेता सदर प्रकल्पांतर्गत नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी 12 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.