Nigdi : पीएमपीएमएलची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – निगडी बस डेपोसमोर रस्ता ओलांडण्यासाठी उभा असलेल्या दुचाकीस्वाराला पीएमपीएमएल बसचा धक्का लागला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी तीनच्या सुमारास भक्ती-शक्ती चौकातील निगडी पीएमपीएमएल बस डेपोसमोर घडली.

बंडू बाबासाहेब शिंदे (वय 55, रा. कर्मयोग हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तानाजी दत्तात्रय नलावडे (वय 27, रा. तापकीर चौक, गणपती मंदिराशेजारी, थेरगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भक्ती-शक्ती चौकातील पीएमपीएमएल बस डेपो समोरून दुचाकीवरून (एम एच 14 / ए जी 1643) जात होते. रस्ता ओलांडण्यासाठी थांबले पीएमपीएमएल डेपोसमोर थांबले असता डेपोमधून आलेल्या एका पीएमपीएमएल बसने (एम एच 14 / सी डब्ल्यू 2131) वळण घेताना त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दत्तात्रय हा त्या बसवरील चालक आहे. या अपघातात शिंदे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विवेक वल्टे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.