Daund : जमावाकडून पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – दौंड येथील यवत पोलीस निरीक्षक यांच्यावर एका जमावाने दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 2) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.

या घटनेमध्ये यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याबाबत पोलीस हवालदार बापू बंडगर यांनी फिर्याद दिली आहे.

नजमा मुल्ला व मुन्ना लोंढे यांच्यामध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत आरोपी अनेक लोक जमवत आपापसात मारहाण करत होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुरज बंडगर आरोपींना वेगळे करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मुन्ना लोंढे याच्या जमावातील एकाने दगड घेऊन सुरज यांच्यावर हल्ला केला. या हल्लामध्ये पोलीस निरीक्षक सुरज यांच्या डाव्या डोळ्यावर गंभीर जखम झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.