Maval Crime News : शिरगावात पवना नदीकाठी लावलेल्या दारूभट्टीवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – शिरगाव येथे पवना नदीच्या किनारी लावलेल्या दारुभट्टीवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यात पोलिसांनी तीन लाख 41 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 16) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली कि, शिरगाव येथे पवना नदीच्या किनारी दारुची हातभट्टी लावली आहे. तिथे दारु तयार करुन एक महिला आजूबाजूच्या परीसरात दारु विक्री करते. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी पावणे तीन वाजता सापळा लावून कारवाई केली.

तीन लाख पाच हजार 800 रुपये किमतीचे सहा हजार 116 लिटर कच्चे रसायन, 12 हजार 600 रुपयांची 210 लिटर तयार गावठी दारु आणि 22 हजार 900 रुपयांचे दारु तयार करण्याचे साहित्य असा एकूण तीन लाख 41 हजार 300 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. दारुभट्टी लावणा-या महिलेच्या विरोधात शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.