Bhosari : शक्तीप्रदर्शन करत आमदार महेश लांडगे शुक्रवारी भरणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – भोसरीचे आमदार महेश लांडगे शुक्रवारी (दि.4) जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी भोसरी मतदारसंघातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे यांना आज (मंगळवारी) भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उमेदवारीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उमेदवारी दिल्याबाबत पक्षनेतृत्वाचे आमदार लांडगे यांनी आभार मानले आहेत.

आमदार लांडगे शुक्रवारी नेहरुनगर येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन ग्राऊंड महादेव मंदिराजवळ लांडगेआळी येथे भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित एकत्र येणार आहेत. त्यानंतर नऊ वाजता मतदारसंघातून रॅली काढत अर्ज दाखल केला जाणार आहे. या रॅलीत मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.