Pune News : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचे येरवडा कारागृहातून पलायन

एमपीसी न्यूज : एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने येरवड्यातील खुल्या कारागृहातून पलायन केले. कैलास गायकवाड असे या कैद्याचे नाव आहे. त्याच्याजवळ तंबाखूजन्य पदार्थ सापडला होता. त्यामुळे आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी तो पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पसार झालेल्या कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील असलेल्या कैलास गायकवाडला एका गुन्ह्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या काही वर्षापासून तो येरवडा खुला कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहात असताना त्याच्याजवळ तंबाखूजन्य पदार्थ सापडले होते. त्यामुळे आपल्यावर कारवाई होईल अशी भीती त्याला वाटत होती. शिवाय उर्वरित शिक्षा चुकवण्यासाठी त्याने खुल्या कारागृहातून पळ काढला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.