Wakad News : हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय ; दोन जणांविरोधात गुन्हा, दोन महिलांची सुटका 

एमपीसी न्यूज – हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय चालवणा-या दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. हॉटेल ओयो टाऊन हाऊस, पुणे बेंगलोर हायवे, वाकड येथे शनिवारी (दि.09) ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय चालवित होते. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून दोन महिलांची सुटका करून, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.