Maval News : पवन मावळातील बौर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

एमपीसी न्यूज – पवन मावळातील बौर गावातील अनेक कार्यकर्त्यांनी तसेच शिवली येथील शंकर महाराज आडकर यांनी गुरुवारी (दि. 12) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वडगाव येथे आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या ध्येय-धोरणांवर प्रभावित होऊन पक्ष प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांचे मत आहे.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, युवक कार्याध्यक्ष सचिन मुऱ्हे, प्रवक्ते राज खांडभोर, विद्यार्थी अध्यक्ष समीर कदम, सरपंच संदीप खिरीड, माजी सरपंच संतोष जांभुळकर, दत्तात्रय पडवळ,मारुती वाळुंज, माजी नगरसेवक अरुण माने, देवा गायकवाड, रविंद्र घारे,सोमनाथ वाघोले, अनिल तुपे, विशाल पवार आदि.मान्यवर उपस्थित होते.

यावेळी हभप शंकर महाराज आडकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बौर कृष्णा दळवी, सदाशिव दळवी, मारुती दळवी, ललित दळवी,गुलाब दळवी,संदीप दळवी, मनोज दळवी, दत्तात्रय दळवी,समीर दळवी,कैलास दळवी,संतोष वाळुंजकर, रमेश म्हस्के, राहुल वायभट,अंकुश दळवी,संतोष दळवी, काळूराम दळवी,भाऊ दळवी, स्वप्नील घारे, पप्पू साठे, कुणाल कडू, नितीन म्हस्के. आदि कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

या प्रसंगी आमदार सुनिल शेळके म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पवार साहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आणि राज्याचा सर्वांगीण विकास हेच पक्षाचे ध्येय असून विकासाची दूरदृष्टी असलेला पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला केवळ राजकारण करायचे नाही, तर तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करायचे आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार सुनिल शेळके यांनी स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.