Bhosari : लघुउद्योग भारती संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज – लघुउद्योग भारती संघटनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत हा पाठिंबा जाहीर केल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

संघटनेच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दीपक फल्ले, महामंत्री राहुल खोले, संचालक राममूर्ती थेवर, खजिनदार प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.

संघटनेचे अध्यक्ष दीपक फल्ले म्हणाले, मागील पाच वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचा लघुउद्योगांना फायदा झाला आहे. उद्योग क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी सरकारने वेळोवेळी पावले उचललेली आहेत. आमदार महेश लांडगे यांनी मागील पाच वर्षांच्या कालावधीत भोसरी परिसरातील लघुउद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे लघुउद्योग भारती संघटनेच्यावतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.