_MPC_DIR_MPU_III

Pimpri : पुढील 50 वर्षांचे पिण्याच्या पाण्याचे भाजपने केले नियोजन – नगरसेवक संदीप कस्पटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळावे यासाठी पुढील 50 वर्षांचे नियोजन करून कामे सुरू करण्यात आली आहेत. भामा-आसखेड, आंद्रा आणि पवना या तीन धरणातून शहरासाठी 400 एमएलडी पाणी शासनाने आरक्षण मंजूर केले आहे. हे पाणी आणण्याच्या कामांना सुरूवात झाली आहे. त्यातून शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे भाजप नगरसेवक संदीप कस्पटे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ वाकड येथे आयोजित कोपरा सभेत संदीप कस्पटे बोलत होते. यावेळी विनायक गायकवाड म्हणाले, “चांगल्या व सक्षम पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे भोसरी, चिंचवड, चाकण, तळेगाव येथील औद्योगिक कंपन्या तसेच हिंजवडी आयटी पार्क यामुळे देशभरातील नागरिक वास्तव्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या शहराची लोकसंख्या देशातील अन्य शहरांच्या तुलनेत जास्त वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढत आहे. 1988 मध्ये शहराची लोकसंख्या 3 लाख 76  हजार होती. ती 2011 मध्ये 17 लाख 30 हजार 133 वर पोचली. गेल्या 9 वर्षांत या लोकसंख्येत तबब्ल 10 लाखांची भर पडली आहे. आजमितीला शहराची लोकसंख्या 27 लाखांहून अधिक आहे.

पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भाजपने पुढील 50 वर्षांचे नियोजन करून शहरासाठी अतिरिक्त पाणी आणण्याचे काम हाती घेतले आहे. सरकारने पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा-आसखेड या धरणातील 167 एलएलडी, आंद्रा धरणातील 100 एमएलडी आणि पवना धरणातील 133 एमएलडी असे एकूण 400 एमएलडी पाण्याचे आरक्षण मंजूर केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.