Pune : 7 मृत्यू, 117 नवे रुग्ण वाढले, 84 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहरात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा 100 च्या पुढे गेला. आज ( गुरुवारी) दिवसभरात 117 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर कोरोनाबाधित 7  रुग्णांचा मृत्यू झाला. 84  रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या पुण्यात कोरोनाबाधित 72 रुग्ण क्रिटिकल आहेत. त्यातील 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 2146  असून अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1350 आहे. कोरोना संसर्गामुळे आजपर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 125  आहे.

उपचार घेत असलेले हे सर्व रुग्ण ससून हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. दरम्यान, पुढील 2  आठवडे कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याचा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. सध्या कोरोनाचा चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. दररोज तब्बल 1500 चाचण्या करण्याचे नियोजन सुरू आहे.

आज भवानी पेठेतील 86 वर्षीय आणि 65 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, गंज पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये व 60 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन येथे मृत्यू झाला. येरवडा येथील 70 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, तर 75 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. कोंढवा बुद्रुक येथील 69 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आज मृत्यू झालेले सर्व रुग्ण जेष्ठ नागरिक होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.