Pune : शहरात कोरोनाचे 1512 रुग्ण, 805 जणांना डिस्चार्ज, 30 मृत्यू

1512 patients of corona in the city, 805 discharged, 30 deaths :आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 35 जणांचा मृत्यू झाला

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या मंगळवारी 6 हजार 222 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1512 रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. 805 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 30 जणांचा मृत्यू झाला.

सध्या विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत असलेले 616 क्रिटिकल रुग्ण असून त्यात 99 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाचे आता 40 हजार 715 रुग्ण झाले आहेत. 24 हजार 246 जणांनी वेळीच उपचार घेतल्याने त्यांनी कोरोनावर मात केली. शहरात 15 हजार 434 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागतर्फे देण्यात आली आहे.

बिबवेवाडीतील 80 वर्षीय आणि 90 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 78 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 54 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 82 वर्षीय पुरुषाचा, एनआयबीएम रोडवरील 54 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, मृत्यू झाला.

सोमवार पेठेतील 46 वर्षीय महिलेचा, लोहगावमधील 71 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 73 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, तर कोथरूडमधील 73 वर्षीय पुरुषाचा सिमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, विमाननगरमधील 84 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, टिंगरेनगरमधील 78 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

शिवणेतील 76 वर्षीय पुरुषाचा देवयानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 71 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 83 वर्षीय महिलेचा रायसिंग मेडीकेअर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 49 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, कसबा पेठेतील 82 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, केशवनगरमधील 60 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

केदारीनगरमधील 55 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, वडगावशेरीमधील 64 वर्षीय महिलेचा रायसिंग मेडीकेअर हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 71 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, हांडेवाडीतील 65 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

विश्रांतवाडीतील 51 वर्षीय पुरुषाचा विनोद मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, खराडीतील 45 वर्षीय महिलेचा, कोंढाव्यातील 41 वर्षीय पुरुषाचा, नाना पेठेतील 64 वर्षीय महिलेचा, पर्वतीमधील 72 वर्षीय महिलेचा, दत्तवाडीतील 70 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 65 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.