Pune : महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत 50 टक्के कपात!

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही आपल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या दैनंदिन उपस्थितीत ५० टक्के कपात केली आहे. हे आदेश दिनांक ३१ मार्चपर्यंंत लागूू राहणार आहेत. आयुक्त शेखर गायकवाड यांनी हा आदेश जाहीर केला.

महापालिकेच्या आरोग्य विभाग, घनकचरा व व्यवस्थापन विभाग, अग्निशामक विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, सुरक्षा विभाग, अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, मलनि:सारण देखभाल व दुरूस्ती विभाग, मोटार वाहन विभाग व संबंधित विभाग तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यलयांना लागू राहणार नाही.

क्षेत्रिय स्तरावर ज्या अधिकारी / कर्मचारी यांना त्यांच्या कामकाजाचा भाग म्हणून कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते अशा कार्यालयांना तसेच आपत्कालीन व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कार्यालयांनाही लागू राहणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.