Pune: महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांनाही कोरोनाची लागण

Pune: 8 members of Mayor Murlidhar Mohol's family also corona affected महापौर मोहोळ यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन चाचणी करण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज- महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली असताना त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांनाही या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. महापौर मोहोळ यांच्यावर कोथरूडमधील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोहोळ यांच्या कुटुंबातील 17 सदस्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर, इतर सदस्यांचे अहवाल येणे बाकी आहे. महापौर यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे. महापौरांना कोरोना झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

महापौर यांचे आई-वडील, मुलगी, पत्नी आणि जवळचे नातेवाईक यांची कोरोना चाचणी करण्यात आली  होती. त्यामध्ये काही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महापौर मोहोळ यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन चाचणी करण्यात येत आहे. पुणेकरांना चिंता वाढविणारी ही बातमी आहे. मोहोळ यांच्या कुटुंबातील ज्या लहान मुलांना सौम्य लक्षणे आहेत, ते घरातच राहतील.

पुण्यातील विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळी महापौर मोहोळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांची चाचणी होणे आवश्यक आहे.

मोहोळ यांनी पुणे महापालिकेतील आरोग्य विभाग आणि इतर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली होती. त्यामुळे या सर्वांची चाचणी होण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.