Pune : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज –  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने पेट्रोल पंपावर दरोडा (Pune ) टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.12) हडपसर येथील हिंदुस्थान पेट्रोलपंपाच्या मागील मोकळ्या जागेत करण्यात आली.

अमन संजय दिवेकर (वय 22, इंदिरानगर,पुणे), विशाल संजय लोखंडे (वय 24 रा.इंदिरानगर, पुणे) व विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत असताना भोसले विलेज मागे हिंदुस्थान पेट्रोलियम जवळील मोकळ्या जोगेत काही जण संशयितरित्या जमल्याची माहिती पथकाला मिळाली.

Dehugaon : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला, आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यातील काहीजण आंधाराचा (Pune ) फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी त्यातील तिघांना मात्र शिताफीने पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे मिरची पावडर , नायलॉनची दोरी, घातक शस्त्रे, कोयते असा एकूण 65 हजार 940 रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता. त्यांनी पेट्रोल पंपाची रेकी केली होती. ते पाच जण मिळून पेट्रोलपंपावरील कॅश चोरणार होते. त्यांच्याकडे मिळून आलेले दोन मोबाईल देखील त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून कोंढवा पोलीस ठाणे परिसरातून चोरले होते. आरोपींनी हडपसर येथे ही एका नागरिकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते.

पोलीस तपासात आरोपींवर जबरी चोरीचे कोंढवा, हडपसर, वानवडी, स्वारगेट, बिबेवाडी, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यात एकूण 18 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा पाच च्या पथकाने याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास हडपसर पोलीस करत  (Pune ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.