BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शुक्रवार पेठेतील नेहरु चौकात एका घराची भिंत कोसळली; एकजण जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यातील शुक्रवार पेठ, नेहरु चौकात एका घराची भिंत पडल्याची घटना घडली असून यात एकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याची माहिती अग्निशमन दलला देण्यात आली असून त्यानुसार अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. यातील एकास जखमी व्यक्तीस नागरिकांनी नाईक हॉस्पिटल, गुरुवार पेठ येथील दवाखान्यात दाखल केले आहे.

याबाबत अधिक मिळालेली महिती अशी, पुण्यात शुक्रवार पेठ, नेहरु चौकात एका घराची भिंत कोसळली. वाड्याची भिंत दुसऱ्या बाजूच्या घरावर पडली. हा वाडा बराच धोकादायक असून कधीही पडू शकतो. याबाबत घरपडी विभागास कळविले होते, असे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांना 02:25 वाजताचा कॉल आला असल्याचे सांगितले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3