Pune : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार अंगीकृत करा -हभप पुनम जाचक

एमपीसी न्यूज : संतनगर मित्र मंडळ, संतनगर मोशी-प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड, पुणे (Pune) आयोजित शिवजंयती उत्सव सोहळा पार पडला. यावेळी या प्रभागातील नगरसेवक संजयशेठ वाबळे, नगरसेविका नम्रता लोंढे, युवानेते योगेश लोंढे, कामगार नेते हनुमंतअण्णा लांडगे, युवा नेते निलेश मुटके, शिवनेर मित्र मंडळाचे अध्यक्ष अण्णा मटाले, दिपक सोनवणे व इतर मान्यवर उपस्थित होते. संतनगर मित्र मंडळ व भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलनाना वाळुंज यांनी मान्यवर व सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलन करुन महाराजांची आरती करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा वृक्षांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना भूगोल फाउंडेशन करत असलेल्या पर्यावरण, वृक्षारोपण व गडकिल्ल्यांच्या स्वच्छता, संवर्धन या कामाचे कौतुक करून शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

नंतर आपल्याच भागातील ज्ञानदा क्लासेस व ब्लु बेरीज् प्री किड्सच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज, पर्यावरण व भावी पिढी या विषयावर
बोलताना सुप्रसिद्ध शिवव्याख्यात्या, कीर्तनकार हभप पुनम जाचक – कोलते पाटील यांनी आपले विचार (Pune) मांडले.

Talegaon Dabhade : तालुक्यातील पाच केंद्रांवर बारावीच्या परीक्षेला सुरुवात

भावी पिढी श्री छत्रपती शिवाजी महाराजांसारखी घडवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येक आई प्रथम जिजाऊ माँसाहेब बनायला हव्यात. अध्यात्मा बरोबर आपण आपला परिसर, नद्या, गडकिल्ले, मंदिर परिसरात घाण करू नये, प्रदूषण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.

पूर्वी इंद्रायणी नदीत मनोभावे स्नान करणारे आता प्रदूषित पाण्यात हातपाय धुण्यासही विचार करतात. त्यासाठी इंद्रायणी सेवा संघ नदी स्वच्छतेचे महान कार्य करत आहेत. आपल्या राजाने जातीभेद न करता अठरा-पगड जातींच्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली व अखंड महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानचे आराध्य दैवत बनले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 350 किल्ले आपल्या ताब्यात असताना व ते बांधताना पर्यावरणाला बाधा येणार नाही याची काळजी घेतली. वृक्ष तोड न करता अनेक वृक्ष लावून त्यांचे संवर्धन केले. प्रजेतील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल असे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. परस्त्री मातेसमान मानून त्यांचा आदर केला.

म्हणून आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार अंगीकृत (Pune) करणे ही काळाची गरज आहे.

व्याख्यानानंतर मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, की भूगोल फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण, गडकिल्ले स्वच्छता संवर्धन, प्लास्टिक मुक्ती, जनप्रबोधन करून पर्यावरण व आपली वसुंधरा, निसर्गाचा समतोल राखण्याचे कार्य केले जाते. तसेच आध्यत्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य केले जाते.

इंद्रायणी सेवा संघाच्या माध्यमातून इंद्रायणी नदी साफसफाई करण्याचे कार्य केले जाते ज्यामध्ये सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला परिसरातील सहकारी महिला, मुले बहुसंख्येने हजर होते.

शेवटी शिवनेर पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे- पाटील यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करून आलेल्या मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी मंडळाचे उद्योजक नवनाथ शेठ कोलते पाटील, अनिल जगताप, विठ्ठल वीर, भास्कर दातीर, उद्योजक मारुती गायकवाड, पोपट हिंगे, कर्नल तानाजी अरबुज, शशिकांत वाडते, साहेबराव गावडे, राजेंद्र ठाकूर, सीताराम वाळुंज, उद्योजक दत्तात्रय राठोड, अजिंक्य पोटे, जयसिंग कोहिनकर, सतीश देशपांडे, नंदकुमार ताकवले, जे .डी.माने, शंकर राजगुडे, संकेत थोरात, शिवराम काळे, शंकर पवार, राहुल काळे, भरत सरडे, मच्छिद्र बुर्डे, नेताजी पाटील, अशोक पोटे, विष्णु करंजखिले, संजय कांबळे, उद्योजक शिवानंद मगदुम, संजय रेड्डी, सुरेश फरताळे, हरिदास गोगावले, संजय चाकणे, विठ्ठल मिसाळ, अभिनव सागडे, विकास सावंत, अजय म्हस्के, कृष्णा नायक, उत्तम काकडे, केदार काका, अंकुश जाधव, अशोक यादव, नारायण बढेकर, महादेव गोमे, ज्ञानदेव जगताप, गजानन पाटील, मधुकर शिंदे व इतर ज्येष्ठ नागरिक, तसेच इतर महिला व मुले हजर होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.