Pune : छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मत्स्यालयामध्ये लागली आग

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर येथील जंगली महाराज (Pune) मंदिर रस्त्यावर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मत्स्यालयामध्ये रविवारी 30 जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाकडून कसबा व एरंडवणा अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. मत्सालयाच्या मागील बाजूस असलेल्या दोन ए.सीने पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Today’s Horoscope 31 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

तसेच, या भिंती फोम व फायबरच्या असल्याने मोठ्या प्रमाणात धुर (Pune) निर्माण झाला असल्याने जवानांनी बी.ए.सेट परिधान करुन आगीवर सुमारे पंधरा मिनिटात नियंत्रण मिळवले.

तसेच दलाकडील एक्झॉस्ट ब्लोअर वापरुन धूर बाहेर जाण्यास मार्ग करुन दिला. आगीचे कारण व वित्तहानी समजू शकले नाही. परंतु, आगीमध्ये दोन एसी, वायरिंग व इतर साहित्य जळाले आहे. आगीमध्ये जखमी वा जिवितहानी झाली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.