Pune news : कोयत्याने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयची रवानगी तुरुंगात

एमपीसी न्यूज : पुण्यातील काशेवाडी परिसरात कोयत्याने केक कापून भर रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या एका बर्थडे बॉय ला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.(Pune news) अतिश जालिंदर लांडगे (वय 26) असे या बर्थडे बॉय चे नाव आहे. खडक पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली होती की, आरोपीने वाढदिवसाच्या दिवशी हातात कोयता घेऊन केक कापला आणि आरडाओरडा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन काशेवाडी परिसरात छापा घालून आरोपी अतिश लांडगे याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Purushottam Karandak competition : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा ऐतिहासिक निकाल, यंदाचा करंडक कोणालाच नाही

रात्री अपरात्री काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण शहरातील चौकात गर्दी करून वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढले आहेत.(Pune news) दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार कोयता यासारख्या हत्याराने कापतात. त्याचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर टाकतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.