Chandani chowk traffic : अचानक घेतलेल्या ब्लॅाकने चांदणी चौकात वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज : चांदणी चौकाजवळ टेकड्या फोडण्यासाठी (Chandani chowk traffic) पुणे – सातारा हायवेवर न सांगता ब्लॉक घेतल्याने हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

पुणे -बंगलोरु / पुणे – 17 हायवेवरील चांदणी चौकातील नेहमीची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथील फुल पाडण्यात आला होता. चौकाच्या बाजूला असलेल्या टेकड्या फोडून रस्ता तयार करण्यात येत आहे.

Fake documents : बनावट कागदपत्रांद्वारे जागेवर कब्जा, 15 जणांवर गुन्हा दाखल

याबाबत आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड यांनी माहिती दिली की आज दुपारी 1 वा. च्या सुमारास चांदणी चौकाच्या बाजूला असलेल्या टेकड्या फोडण्यासाठी ब्लास्ट करण्यासाठी 20 मिनिटे वाहतूक थांबविण्यात आली होती.(Chandani chowk traffic) त्यामुळे चौकाच्या चारही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 1 ते 1.5 तास लागला.

भोईटे म्हणाले की, यापुढे ब्लॉक फक्त रात्री 1 ते 2 वा दरम्यान घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल व वाहनचालकांना त्याचा त्रास होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.