Pune : केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेतून नागरिकांना विविध योजनांचा लाभ

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिके मार्फत केंद्र सरकारच्या (Pune) महत्वकांक्षी योजनांचे फायदे तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्राचा रथ आज सकाळी निंबाळकर तालीम चौक पुणे येथे सकाळी 10 ते 1 व दुपारी पत्र्या मारुती चौक लक्ष्मी रोड पुणे येथे दु 2 ते 6 या ठिकाणी पोहचला.

पुणे शहरातील मध्य ठिकाणी असलेल्या वरील दोन्ही ठिकाणी अतिशय गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणी आज झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून अंदाजे सहा हजार नागरीकांपर्यंत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी, प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना शहरी गरीब योजना,आधार कार्ड, आरोग्य तपासणी,राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम ,अन्नसुरक्षा योजना अशा योजनांची पत्रकाद्वारे तसेच रथाच्या माध्यमातून माहिती देणेत आली.

Mahavitaran : माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

सदर ठिकाणी भेट दिलेल्या नागरिकांपैकी योजनांचा लाभ घेण्यासाठी (Pune) पात्र आहेत. अशा 535 नागरिकांना प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड, आधार कार्ड, मोफत आरोग्य तपासणी, प्रधानमंत्री स्वनिधी योजना,उज्वला गॅस योजना, शहरी गरीब कार्ड ,रेशन कार्ड अशा योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे.

या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे पुणे शहरातील नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करणेत येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.