Pune Climbers Campaign : गिर्यारोहक गिरीजा लांडगे हिने काला नाग पर्वतावर चढाई करत दिला ‘लेक वाचवा’चा संदेश

एमपीसी न्यूज – गिर्यारोहकांच्या चढाईसाठी (Pune Climbers Campaign) नावाप्रमाणेच अजस्त्र उत्तराखंडमधील काला नाग (ब्लॅक पीक) पर्वतावर चढाई करण्याचा पराक्रम पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी केला. यामध्ये भोसरीतील बाल गिर्यारोहक गिरीजा लांडगे हिने हा साहसी पराक्रम केला. यावेळी तिने पर्वतावर चढाई करत ‘लेक वाचवा लेक जगवा’ हा संदेश दिला. या शिखरावर चढाईची मोहीम दि. 26 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या दरम्यान आखली होती.

यामध्ये एकूण 8 गिर्यारोहकांचा सहभाग होता. वय वर्षे 13 पासून ते वय वर्षे 51 पर्यंतचे गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले. यामध्ये गिरीजा धनंजय लांडगे (13 वर्षे ), धनंजय सयाजी लांडगे, गोपाल भिमय्या भंडारी, ओंकार सुभाष पडवळ, शालिनी शर्मा, निखिल किसन कोकाटे, सुनिल पिसाळ (51 वर्षे ), विश्वजीत पिसाळ ( 50 वर्षे ) यांनी सहभाग घेतला. एकूण 15 दिवसांची मोहीम होती.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी उत्तराखंड येथील 6 हजार 987 मी. उंचीच्या शिखरावर 6 हजार 10  मीटरपर्यंत यशस्वी चढाई केली. बंदरपूंछ पर्वतरांगेतील अतिदूर्गम व अजस्त्र असा ब्लॅक पीक (काला नाग) पर्वत आणि त्यावर असणाऱ्या हिमभेगा, चढाईसाठी 75 ते 80 अंश कोनात असणारा तीव्र चढ आणि उणे 15 अंश सेल्सियस असणारे तापमान यामुळे चढाईसाठी अतिकठीण मानला जातो.

Pimpri Corona Update : शहरात आज 65 नवीन रुग्णांची नोंद; 50 जणांना डिस्चार्ज

गिर्यारोहक धनंजय लांडगे म्हणाले की, सुरुवातीचे 2 दिवस पुणे ते देहरादून रेल्वे प्रवास करून आमची टीम देहरादून येथे पोहोचली, ही मोहीम सेमी (Pune Climbers Campaign) अल्पाईन पद्धतीची असल्याने सोबत असलेले तांत्रिक साहित्य वगळता मोहीमेसाठी लागणारे सर्व किराणा , भाजीपाला साहित्य बाजारातून गोळा करून लोकल गाईडच्या साह्य्याने टिमने पुढील प्रवासाला सुरूवात केली. सांक्री ते तालूका या गावांदरम्यानचा गाडीप्रवास चालू असताना तीन ठिकाणी भूस्खलन सारख्या नैसर्गिक संकटावर मात करत पुढे जावे लागले. सेमी अल्पाईन पद्धत असल्याने मोहीमेसाठी लागणारे साहित्य जवळजवळ प्रत्येकी 25 किलो वजन घेऊन बेस कॅंप – अॅडव्हान्स कॅंप पर्यंत रोज सरासरी 10 किमी पायी ट्रेक करत व रोज पाचशे ते सातशे मीटर पर्यंत उंची गाठत सर्वजण कॅंप पर्यंत पोहोचले. दरम्यान, जाताना टीमला भूस्खलनसारख्या नैसर्गिक अडचणीला सामोरे जावे लागले . बेस कॅंप पर्यंत पोहोचण्यासाठी आलेल्या अनेक अडचणींवर मात करत, अगदी टिमने बेस कॅंप ते समिट कॅंप पर्यंत भूस्खलन (Land Slide) ने पूर्णपणे बंद झालेल्या रस्त्यांवर स्वतः रस्ता तयार करत, नैसर्गिक अडचणींवर मात करत सम्मिट कॅंप गाठला.

ही महाराष्ट्रातील पहिली टीम ठरली आहे; ज्यांनी कालानाग ( ब्लॅक पीक) पर्वतावर 6 हजार 10 पर्यंत यशस्वी चढाई करून तिरंगा ध्वज फडकावत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. तसेच, ‘लेक वाचवा, लेक जगवा, लेक वाढवा’’चा संदेश देण्यात आला. या मोहीमेत रोज सकाळ संध्याकाळ गणरायाची आरती करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या गिर्यारोहण मोहीमेस दूर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था, सह्याद्री रोव्हर्स, ध्यास सह्याद्री, शिवदुर्ग मित्र लोणावळा, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन, अॅडव्हेंचर डायरीज, ॲडव्हेंचर मंत्रा, माऊंटेन स्पोर्टस ॲकॅडमी या संस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या संस्थांच्या सहकार्याने (Pune Climbers Campaign) पहिल्यांदाच अशी मोहीम संयुक्तिकपणे राबवण्यात आली, अशी माहिती गिर्यारोहक धनंजय लांडगे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.