Savarkar Mandal Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य योजने अंतर्गत 110 आर्थिक दुर्बल मुलांना मदत

एमपीसी न्यूज –  स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी (Savarkar Mandal Nigdi) यांनी या वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य योजना सुरू केली असून या अंतर्गत झोपडपट्टी भागातील अनुदानित 9 शाळांमधील एकूण 110  मुलांची शाळेची वार्षिक फी या योजनेद्वारे भरण्यात आली. यापुढे दरवर्षी ही योजना राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुशराव शिंदे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोदजी बन्सल यांच्या हस्ते सावरकर मंडळ निगडी येथे झालेल्या जाहिर कार्यक्रमात लाभार्थी विध्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत ही मदत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे धनादेशाद्वारे देण्यात आली.

Pune Climbers Campaign : गिर्यारोहक गिरीजा लांडगे हिने काला नाग पर्वतावर चढाई करत दिला ‘लेक वाचवा’चा संदेश

या प्रसंगी पोलिस आयुक्त अंकुशराव शिंदे म्हणाले की, आज (Savarkar Mandal Nigdi) शिक्षणाला पर्याय नाही व योग्य विद्यार्थ्यांना अशी मदत मिळायलाच हवी आहे व समाजातील सबलांनी यासाठी पुढे येण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ज्या मुलांना आज अशी मदत मिळत आहे, त्यांनी हे लक्षात ठेवून मोठे झाल्यावर अशा गरजवंत मुलांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संदेश त्यांनी मुलांना दिला.

सावरकर मंडळाचे सचिव प्रदीप पाटील यांनी याप्रसंगी सर्वांचे स्वागत केले व मंडळाच्या कार्याची सर्वांना माहिती दिली. शैलजा सांगळे यांनी या उपक्रमाची माहिती व त्या मागील मंडळाची भूमिका सांगितली व यासाठी मदतीचे आवाहन सर्वांना केले. मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर यांनी सर्वांचे आभार मानले व धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीता रानडे व रमेश बनगोंडे यांनी मोलाची मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.