Dehugaon : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – देहूगावातील (Dehugaon) मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने 74 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वात्सल्य दिव्यांग अनाथ आश्रम येथे श्री स्वामी रामानंद तीर्थ यांचे पूजन केले. अनाथ आश्रमाला धान्य व जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तिरूपती पांढरे हे होते. तर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कविता धोंडगे, हेमा गवारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हानमंत ढगे, किरण पवार, राजीव चिद्रे, दौलत वाकुरे, नितीन बनसोडे, विठ्ठल अटक, संदीप गिरी,गोविंद मजगे,प्रकाश राऊत,विजयमुर्ती बिराजदार,कैलास वाघमारे,दत्ता धोंडगे, शिवाजी लाखाळ,महादेव आडमाने, देविदास रोडे,निखिल घारोळकर, योगेश शेलार,सोमनाथ काळे, शिवराज मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव बोराटे यांनी केले.

Savarkar Mandal Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य योजने अंतर्गत 110 आर्थिक दुर्बल मुलांना मदत

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन का साजरा केला जातो? – Dehugaon

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, 17 सप्टेंबर 1948  रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.