Pune : शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचा विळखा वाढतोय

भवानी पेठेत 266, ढोले पाटील रोड 203, शिवाजीनगर 190, कसब्यात 157 रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कडक अंमलबजावणी करूनही कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहे. या रोगाचा हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या भवानी पेठेत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहे. सध्या या भागात 266, ढोले पाटील रोड 203, शिवाजीनगर – घोलेरोड 190, कसबा – विश्रामबागवाडा 157, येरवडा – कळस – धानोरी परिसरात 167 कोरोनाचे रुग्ण आहेत. या भागांत कोरोनाचा प्रकोपच झाल्याचे स्मार्ट सिटीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिसून येत आहे.

त्याचबरोबर शहरातील धनकवडी – सहकारनगर 64, वानवडी – रामटेकडी 63, बिबवेवाडी 36, हडपसर – मुंढवा 51, नगररोड – विश्रांतवाडी 35, कोंढवा – येवलेवाडी 19, सिंहगड रोड 11, वारजे – कर्वेनगर 9, औंध – बाणेर 4, कोथरूड – बावधन 2, पुण्याबाहेरील 58 असे 1444 कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती पुणे स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आली. झोपडपट्ट्या, दाटीवाटीने असलेल्या भागांतही कोरोना वाढतच आहे.

लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करण्यात आली आहे. तरीही नागरिक बाहेर पडत असल्याने कोरोनाचा प्रसार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या 340 शाळांत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. 40 दिवसांच्या या कालावधी दरम्यान सर्वसामान्य पुणेकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. पोलिसांनीही संचारबंदीची कडक अंमलबजावणी करून नागरिकांना बाहेर निघण्यास अटकाव केला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा आता 1722 वर गेला आहे. एका रात्रीत 127 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये शहरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 86 नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.