Pune Corona Update : शहरात नवीन 188 कोरोना रुग्णांची नोंद; 360 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. शहराच्या विविध भागातील नवीन 188 कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 360 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 340 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 59 हजार 653 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 773 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 188 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 3 हजार 596 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 44 लाख 72 हजार 692 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख कमालीचा उतरता पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.