Pune : कोरोनामुळे आजही 6 जणांचा मृत्यू ; नवीन 163 रुग्ण, 109 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या १६३ झाली आहे. सहा जणांचा मृत्यू झाला. १०९ रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ही माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिली आहे.

कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढून 2 हजार 987 झाली आहे. तर, गुरुवारी 6 जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामध्ये 4 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.

हे सर्व मृत 40 – 60- 70- 80 या वयोगटातील आहेत. आतापर्यंत या रोगामुळे पुणे शहरात 169 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आज कोरोनाचे नवीन 163 रुग्ण आढळले. 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 116 गंभीर रुग्ण असून, 34 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

घोरपडी पेठेतील 39 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 70 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कॅम्प भागातील 66 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तर कॅम्प भागातील 85 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, लोहगाव भागातील 72 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणि हडपसर भागातील 48 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. कोरोनामुळे 40 -50 ते 80 या वयोगटातील जेष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यामध्ये मधुमेह, किडनी विकार आणि इतर आजार असलेल्या नागरिकांचा समावेश आहे.

या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. पुणे जिल्हयातील 3 हजार 352 बाधीत रुग्ण असून 1 हजार 533 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 641 आहे. कोरोनाबाधित एकूण 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 116 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.