Pune Corona Update: पुण्यात कोरोनाचे आज नवे 523 रुग्ण, 328 जणांना डिस्चार्ज तर 25 जणांचा मृत्यू

Pune Corona Update: 523 new corona patients in Pune today, 328 discharged and 25 dies पुणे शहरात कोरोनाचे 16 हजार 125 रुग्ण झाले आहेत. तर, 6 हजार 65 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 9 हजार 447 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाचे रविवारी 523 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आज 328 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 25 जणांचा मृत्यू झाला. 324 रुग्ण गंभीर असून त्यात 54 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 613 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात कोरोनाचे 16 हजार 125 रुग्ण झाले आहेत. तर, 6 हजार 65 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 9 हजार 447 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

हडपसरमधील 67 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कात्रजगावमधील 68 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, कर्वेनगरमधील 82 वर्षीय महिलेचा संजीवनी हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 49 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

पांडवनगरमधील 58 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रस्त्यावरील 52 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 75 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, घोरपडी गावातील 80 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढवा खुर्दमधील 69 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, कोंढाव्यातील 64 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, पद्मावतीमधील 81 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 31 वर्षीय महिलेचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

लोहगावमधील 65 वर्षीय महिलेचा डी. एच. औंध हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 54 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, तावरे कॉलनीतील 72 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 54 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, बोपोडीतील 53 वर्षीय महिलेचा पुना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

नाना पेठेतील 68 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 76 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 75 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रस्त्यावरील 57 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढाव्यातील 69 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, दापोडीतील 48 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, पुणे कॅम्पमधील 81 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, सोलापूर जिल्ह्यातील 60 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.