Pune Corona Update: दिवसभरात 1175 जणांना डिस्चार्ज तर 992 नवे रुग्ण; 18 कोरोना बाधितांचा मृत्यू

Pune Corona Update: 992 new patients and discharge of 1175 people; Death of 18 Corona victims आज 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील 5 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.

एमपीसी न्यूज-  पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परंतु, आज (दि.26) बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पुणे शहरात आज दिवसभरात 992 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर 1175 रुग्ण यातून पूर्णपणे बरे झाले आहे. शहरात सध्या 18,298 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शहरात आजपर्यंत एकूण 2,44,097 चाचण्या झाल्या आहेत. तर आजच्या दिवशी 2506 चाचण्या झाल्या. त्यात 992 नवे रुग्ण सापडले. आज 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील 5 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.

शहरात 13 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले असून यात ससून 3, डीएमएच 3, नायडू 3, सिम्बॉयोसिस 1, भाकरे 1, डीएच औंध 1 आणि केईएम 1 असा तपशील आहे. हे मृत्यू 25 ते 26 जुलैदरम्यानचे आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 48,057 आहे. त्यातील 18,298 हे सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत 28,593 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 682 रुग्ण हे गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात 105 जण हे व्हेंटिलेटवर आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत 1166 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.