Pune Corona Update : दिलासादायक…आज पुणे महापालिका हद्दीत 4759 कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका हद्दीत आज सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज 4661 इतक्या नव्या तर 4759 कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आहे.

आज पुणे परिसरातील 55 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 21 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1369 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 6619 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 400117 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 49289 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 6498 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 3 लाख 44 हजार 330 जणांना आजपर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.