Pune Crime News : पुण्यात घरफोडीत सोन्याच्या दागिन्यासह पिस्टल व 12 जिवंत काडतूस चोरीला

एमपीसी न्यूज – पुण्यातील पाषाण परिसरात एका व्यावसायीकाच्या घरात शुक्रवारी (दि.10)  रात्री घरफोडी केली ज्यामध्ये चोरट्यांनी घरातील ( Pune Crime News) दागिनेच नाही तर परदेशी बनावटीचे पिस्टल व 12 जिवंत काडतुसे चोरून नेली आहेत.

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात  जगदीश लक्ष्मणराव कदम  (वय-57 रा. शाश्वत बंगला, सिंध सोसायटी, पाषाण रस्ता, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri News : अपयशाने खचू नका, संकटांना सामोरे जा; सिने अभिनेते अनुपम खेर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम हे व्यावसायीक असून त्यांच्याकडे शस्त्रपरवाना आहे. चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे घरात घुसून  कुटुंबीय झोपले होते.चोरट्यांनी बेडरुम मधील कपाट उचकटून ( Pune Crime News) दोन लाखांची रोकड, 3 महागडी घडाळे, सोन्याची चैन असा एकूण 6 लाख 1 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. चंतुःश्रृंगी पोलीसांनी घटनेस्थळाची पहाणी केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.