Pune Crime News : बिर्याणीसाठी दहा रुपये कमी पडले अन्… तरुणाला बेदम मारहाण 

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये बिर्याणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणाकडे 10 रुपये कमी होते. त्यानंतरही त्याने हॉटेलचालकाला बिर्याणी मागितली. त्याचा राग आल्यामुळे हॉटेलचालकाच्या नातेवाईकाने तरुणाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धायरीतील बॉम्बे बिर्याणी सेंटरमध्ये घडली.

_MPC_DIR_MPU_II

सरफरोज उर्फ सफरू फकरोद्दीन शहा (वय 26, रा. बेनकर वस्ती, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अशोककुमार शेदीलाल मौर्या (वय 40, रा. बेनकर वस्ती ) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश काळे (वय 27, रा. धायरी) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास अंकुश बेनकर वस्तीवरील बॉम्बे बिर्याणी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे 10 रुपये कमी होते. त्यानंतरही अंकुशने बॉम्बे बिर्याणीचे मालक अशोककुमारला बिर्याणी मागितली. त्याचा राग आल्यामुळे सरफरोजने अंकुशला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पाईपने बेदम मारहाण केली. याप्रकरणी सिंहगड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.