Pune crime : टोळी युद्धातून खून झालेल्या गुंडाच्या पत्नीचे भयानक कृत्य, डोक्यात आणि लिंगावर शस्त्राचे वार

एमपीसी न्यूज : फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराला निर्जन स्थळी बोलावून त्याच्या डोक्यात आणि लिंगावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Pune crime) टोळी युद्धातून खून झालेल्या कुख्यात गुंडाच्या पत्नी व साथीदारांनी हे भयावह कृत्य केले असून, महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. शहरात मात्र, या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पुनम निलेश वाडकर (वय 35, रा. जनता वसाहत) हिला अटक केली आहे. तिचे तीन साथीदार पसार झाले असून, त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 30 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. या घटनेत तक्रारदार तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

PCMC News : महापालिकेतर्फे क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनम वाडकर हिने खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या फायनान्स कंपनीत तक्रारदार तरूण काम करतो. कर्जप्रकरणात तो कामगार तरुण पुनम यांना व्हॉट्सअपला मॅसेज करत होता. हा प्रकार पुनमच्या मित्राला समजला.(Pune crime) त्यावेळी त्यांनी संगनमतकरून तक्रारदार तरुणाला चॅटिंगद्वारेच स्वामी नारायण मंदिराच्या परिसरात बोलावून घेतले. तक्रारदार तरूण त्याठिकाणी आल्यानंतर पुनमच्या साथीदारांनी त्याला गाडीच्या चावीनेच डोक्यात मारहाण केली.

त्यानंतर त्याच शस्त्राने त्याच्या डोक्यात वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. तरुण गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले.(Pune crime) दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.