Pune Gambling raid: धनकवडीत कुख्यात गुन्हेगाराच्या जुगार अड्यावर छापा

एमपीसी न्यूज: सहकारनगरमधील कुविख्यात गुन्हेगार सुनील निर्मळच्या जुगार अड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करत पर्दाफाश केला आहे. (Pune Gambling raid) या कारवाईत तब्बल 35 जणांवर कारवाईकरून दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात विशाल पडवळ व सुनील निर्मळ यांच्यासह रायटर तसेच खेळणाऱ्यांसह 35 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्याकडून सातत्याने अवैध धंद्याबाबत सूचना केल्या जात आहेत. परंतु, स्थानिक पोलीसांना त्याचा परिणाम पडत नसल्याचे दिसत आहे. वसूली भाई छुप्या पद्धतीने हद्दीत अवैध धंदे चालवत आहेत.पण यावर सामाजिक सुरक्षा विभागाकडून जोरदार कारवाई केली जात आहे. तरीही अवैध धंदे सुरूच आहेत.

 

Online dog license : आता ऑनलाईन मिळणार श्वान परवाना

 

दरम्यान धनकवडीत गुन्हेगार सुनील निर्मळ याचे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. (Pune Gambling raid) त्यानूसार, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक व त्यांच्या पथकाने येथे सुरू असणाऱ्या दोन ठिकाणांवरील जुगारावर छापे टाकले. त्यावर 35 जणांवर कारवाई करत दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.