Pune : निवडणूक अधिकारीच सांगतोय भाजपाला मतदान करा; अधिकारी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज-  कसबा मतदार संघातील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात चक्क निवडणूक अधिकारीच मतदारांना भाजपाला मतदान करा असे सांगताना आढळून आला आहे. पोलिसांनी या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. 

राजेश भोसले असे निवडणूक अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी काँग्रेस पुणे शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे यांनी संबंधित केंद्रावरील निवडणूक अधिकारी यांच्याकडे आणि खडक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश भोसले यांना ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.